राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संताजी मंगल कार्यालय,येथे माजी आ.राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत झाली.बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकी संदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात साकोली नगर परिषदेची निवडणूक असून हि निवडणूक खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात लढविली जाणार.नगर परिषदेची निवडणूक मजबुतीने व नियोजन पद्धतीने लढायची आहे. इच्छुक उमेदवारांनी त्याच्या वार्डातील बुथ स्तरावर कार्यकर्त्यांची फळी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.