दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील बेनक गणपती ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सलगले यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत सिद्धाराम हुडे यांनी वळसंग पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान घडली.