येईल सांगता येत नाही. धाराशिव मध्ये एका पोलिटिकल कॉम्पेनिंगची जोरदार चर्चा आहे. धन्यवाद खा. ओम आम्हाला कळालं.भाजपकडून शिवसेना उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात हे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग सुरू आहे. राजकीय विरोधक असलेल्या ओमराजे विरोधात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या समर्थकांकडून हे कॅम्पेनिंग सुरू असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाल असून चर्चेला उधाण आलं आहे. २ दिवसापासून १२ सप्टेंबर पर्यंत हे कॅम्पेनिंग सुरू आहे.