जळगाव शहरात गणेश विसर्जनाच्या धामधुमीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ममुराबाद येथील २५ वर्षीय तरुण गणेश गंगाधर कोळी हा गणपती विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून वाहून गेला. ही घटना शनिवारी ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता निमखेडी शिवारात नवीन पाळधी ते तरसोद बायपासजवळ घडली.