तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथे वीज पडून एक बैल ठार झाल्याची घटना दिनांक 28 ऑगस्टला दुपारी बारा वाजता दरम्यान घडली.तिरोडा शहर व परिसरात दिनांक 28 ऑगस्ट ला सकाळी 11.30 वाजता दरम्यान मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला.यात घाटकुरोडा येथील फागोदास भाकरू विठुले यांचा एक बैल शेतशिवार परिसरात नदीकिनाऱ्याजवळ चरत असताना वीज पडुन जागीच ठार झाला. या घटनेत फागोदास विठुले यांचे जवळपास 30 हजार रुपयाचे नुकसान झाले.