भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षा सीताताई रहांगडाले, पं.स. सदस्या सौ. नलिनीताई सोनवाणे आणि माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्या निवासस्थानी माजी खासदार सुनील मेंढे यांनी भेट देऊन गणरायाचे मंगलमय दर्शन घेतले.श्रींच्या आशीर्वादाने समाजकल्याणाचे कार्य अधिक उत्साहाने आणि नवनिर्मितीच्या भावनेने पुढे नेण्याची ऊर्जा लाभो. अशी प्रार्थना माजी खासदार मेंढे यांनी केली. यावेळी आमदार विजय रंहागडाले,सभापती चित्रकला चौधरी, संजय बारेवार, प्रदीप बरीयेकर, आदी उपस्थित होते.