अमळनेर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात एका मुलाने आपल्याच जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता समोर आली आहे. किरकोळ वादातून संतप्त झालेल्या मुलाने लोखंडी हातोडीने वडिलांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.