जल हे जीवन आहे.पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही परंतु धनज येथील वार्ड क्रमांक दोन मधील महिलांना पाण्यासाठीच भटकंती करावी लागत आहे.धनज येथील वार्ड क्रमांक दोन मधील महिलांनी आज दिनांक 6 मे ला दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत वर मोर्चा काढून निवेदन सचिवांकडे सादर केले.महिलांचे म्हणणे आहे की त्यांच्या परिसरात गेल्या 20 एप्रिल पासून नळ येत नाही आहे. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर लवकर तोडगा काढून नियमितपणे नळ सोडण्यात यावे...