सांगोला आगारास नवीन पाच एसटी बसेस मिळाल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार शहाजी पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याबाबत सहा सप्टेंबर दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास माजी आमदार शहाजी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. सांगोला आगारास आतापर्यंत दहा गाड्या मिळाल्या असून अजून दहा गाड्यांची मागणी आहे. त्याही लवकरात लवकर मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.