ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा आणि भविष्यातील हक्कांचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सकल ओबीसी महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी भंडाऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ही बैठक २१ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भंडारा येथे पार पडली. या बैठकीला खासदार प्रशांत पडोळे व आमदार विजय वडेट्टीवार यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीत एनटी, एसबीसीसह सर्व ओबीसी समाजाचे आरक्षण, हक्क आणि न्याय मिळविण्यासाठी लढ्याचा बिगुल वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला.