कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावर सोमवारी सकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. घाटनांद्रे गावातील सुनील विलास शिंदे (वय २८, राहणार घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) या तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तिसंगी गावापासून थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला सुनील शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी त्यांची मोटरसायकल उभी होती, तर डोक्यात दगड घालून केलेल्या हल्ल्यात त्यांचा चेह