7 सप्टेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राहुल पांडे हे एनडीए हॉस्पिटलचे इन्चार्ज असून त्याच परिसरात राहणारा कुख्यात आरोपी कुलजीत रैन याने हॉस्पिटलमध्ये घुसून 15 हजार रुपये खंडणीची मागणी केली. तसेच आरोपीने केबिनमध्ये घुसून चाकूच्या धाकावर दोन हजार रुपये सुद्धा नेले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.