आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या सुमारास बेलापूर-ठाणे रोडवरील विटावा रेल्वे ब्रिजखालील बोगद्यात एक कंटेनर अडकला आहे. कंटेनर अडकल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. ऐन सकाळच्या वेळी ही घटना घडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अंमलदार घटनास्थळी उपस्थित असून, क्रेन आल्यानंतर मार्ग मोकळा करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.