नाशिक शहरातील सर्वाधिक वर्दळ व व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मेनरोड भागात मनपाच्या अतिक्रमण विभागाचे पथक दाखल झाल्यानंतर रस्त्यावर हातगाडी व्दारे छोटे मोठे व्यवसाय करणारे तसेच दुकानाच्या बाहेर वस्तू विक्रीस ठेवणाऱ्या व्यावसायिकांची एकच धावपळ झाली. विशेष म्हणजे अतिक्रमण पथक गेल्यानंतर काही वेळातच परिस्थिती जैसे थे झाली.