आज गडचिरोली येथे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या “Vision Gadchiroli 2K25” या खुल्या चर्चासत्रात रोजगार, कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, उद्योग तसेच पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली.विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली मौल्यवान मतं आणि सूचना मांडल्या.