नरसाळा खापा शिवारात ट्रक आणि दुचाकीची भीषण धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू दि. १० सप्टेंबर – एम.एच. ४० ई.पी. ५८६४ या क्रमांकाच्या दुचाकीला एम.एच. ३६ एफ २३६० या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज दुपारी 3 वाजता च्या सुमारास नरसाळा खापा शिवारात घडली. यात उत्तम ऊइके रा.वर्धा जि.वर्धा असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.