आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास नौपाडा येथे ठाणे महापालिका परिवहन विभागाच्या बसचा अपघात झाला आहे. ठाणे ते बोरिवली चालणारी ही बस असून नौपाडा येथे दुभाजकावर ही बस आदळली आहे. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.