समुद्रपूर:गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गिरड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. या प्रचंड पावसामुळे शेतातील भात, सोयाबीन, कापूस, व तुरीची पिके पाण्याखाली गेली आहेत.शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अक्षरशः पाणी आले असून, एका क्षणात संपूर्ण कष्टावर पाणी फिरल्याची भावना त्यांना होत आहे. गिरड भागातील मोहगांव, केसलापार, तावी, रासा, वानरचुवा, शिवणफळ, जोगीनगुंफा, उंदीरगाव व अंतरगाव या गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला.