तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने 29 सप्टेंबर सोमवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास माजी आमदार सुधीर पारवे यांनी तितुर- नवरगाव शिवारात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. याबाबत चे वृत्त असे की अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, तूर,कापूस ,धान आदी पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी माजी आमदार सुधीर पारवे यांनी केली.याप्रसंगी तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.