भाजपने म्हटले की, 'देवेंद्रजी फडणवीस हे मॅन ऑफ मिशन आहेत, तर संजय राऊत मॅन ऑफ कमिशन आहेत.' भाजपने संजय राऊत यांच्यावर कमिशन खाण्याचे आणि दलाली वसूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. अलिबागमध्ये संजय राऊत यांच्या नावाने दहा प्लॉट असून, ते कमिशनच्या माध्यमातून खरेदी केल्याचे भाजपने म्हटले. या प्लॉटचे सातबारे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपने केला.