मोहफुलाच्या हातभट्टीच्या दारूची साठेबाजी करून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 लिटर मोहफुलाच्या हातभट्टीचा दारूसाठा पकडल्याची घटना घडली. ही घटना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत जवाहरनगर पोलिसांनी सचिन सेवक वाडिभस्मे (39) रा खरबी यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.