भुम पोलीस ठाणे फिर्यादी दशरथ शिवाजी साठे (वय 51 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गुरुदेव शाळेजवळ, भुम ता. भुम, जि. धाराशिव) यांच्या अंदाजे ₹50,000 किंमतीच्या हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्रमांक MH-25 AR-0139) ही दिनांक 28.08.2025 रोजी सायं. 5.45 ते 6.10 वा. दरम्यान आठवडी बाजार परिसरातील पानसुपारी विक्रीच्या गल्लीतून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. या घटनेबाबत फिर्यादी नामे दशरथ साठे यांनी दिनांक 29.08.2025 रोजी भुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.