सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यमहोत्सवाचा लोगो घोषित केल्यानंतर त्याचबरोबरीने गीताचे आणि विशेष पोर्टलचे लोकार्पण केलेलं आहे. अशी माहिती आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.