नांदुरा नगर परिषद चा कारभार सध्या राम भरोसे असल्याचा पहायला मिळत आहे.गेल्या ४ वर्षा पासून स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक झाली नसल्याने स्थानिक स्वराज संस्थेचा कारभार प्रशासक चालवत आहे. नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकर हे सध्या प्रशासक म्हणून काम बघत आहेत. परंतु तेच नियमित कार्यालयात हजर नसल्यामुळे कर्मचारी मीटिंगच्या नावाखाली कार्यालयाला दांड्या मारताना दिसत आहेत.