आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक महाराजा सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे पार पडली.काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य, गोरगरीब, शोषित, पीडित आणि वंचितांच्या हक्कासाठी सदैव लढा देणारा पक्ष आहे. देशाच्या उभारणीत काँग्रेसचे ऐतिहासिक योगदान आहे असे मान्यवरांनी मार्गदर्शन केले.