शिवशेत येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील प्रधानमंत्री सौर महाकृषी योजनेतंर्गत बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनलची अज्ञात समाजकंटकांनी फोडतोड केल्याची घटना घडली. यामध्ये वायरींग तोडून वरील काचाही फोडण्यात आल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून सततच्या विजेच्या लंपडावामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर अवलंबून रहावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.