ईद मिलाद-उन-नबीच्या पार्श्वभूमीवर नरसी नामदेव येथे मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी दहा वाजता दरम्यान उत्साहात व आनंदात सण साजरा केला. पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्मदिवस म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, आणि सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते.