शिर्डी येथून सराफा व्यापार्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीकडून 37,88,70 रुपये किमतीचे 391.460 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आहे. फिर्यादी नावाने विजयसिंह वसनाजी खिशी वय वर्ष 35, धंदा सोन्या व्यापारी, राहणार आवाळ घुमटी तालुका अमीरगड, जिल्हा बनासकाठा गुजरात हे होलसेल सोन्या विक्रीचा व्यवसाय करीत असून ते शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हापूर आणि अहिल्या नगर येथील सराफ व्यवसायिकांकडे सोनं विक्रीसाठी आणत होते.