चार दिवसापासून बिबट्याचा शहरात मुक्काम असून हा एकच बिबट्या असून इतर अफवांवर विश्वास ठेऊ नका अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रोझोन मॉल येथे १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दिली. बिबट्याला पकडण्यास वन विभाग प्रयत्न करत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे, मात्र या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला आतापर्यंत अपयश आलेले आहे. उल्कानगरीतून हा बिबट्या प्रोझोन मॉलच्या दिशेने आल्याचा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.