गडबोरी वासेरा येथील उमा नदी पुलाखाली आज सकाळी आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. आज सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना पुलाखाली नदीच्या काठाला लटकलेला मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ सिंदेवाही पोलिस स्टेशनला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.