एका वॉटर पार्कमध्ये फिरायला गेलेल्या २८ वर्षीय तरुणीचा झिपलायनिंग करताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरल अरुण आटपाळकर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. नंदकिशोर श्रीपती आटपाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.