इगतपुरी तालुक्यात समता परिषद, बारा बलुतेदार संघ व सकल ओबीसी बांधव यांच्या वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, तसेच ओबीसी प्रवर्गात होऊ घातलेली घुसेखोरी थांबवावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्य