आज मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सुरक्षेसंबंधी आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार घेतला. या पहाणी दरम्यान पोलिस कंट्रोल रूम, सीसीटीव्ही कक्ष तसेच दर्शन रांग आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली. मंडळ आणि पोलिस प्रशासन यांच्या समन्वयाने एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षेसंबंधित अत्याधुनिक उपाय योजना राज्य शासनामार्फत उभारल्या आहेत.