कै.रसिका महाविद्यालयाचा योगा संघ विद्यापीठात प्रथम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व शिवजागृती महाविद्यालय, नळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धा दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत कै. रसिका महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीप यश संपादन केले आहे. मुलाच्या संघाने विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावला व मुलीच्या संघाने विद्यापीठातून द्वितीय क्रमांक पटकावला .