देवरी तालुक्यातील सुरतोली ओवारा परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे गेल्या पंधरवाड्यापासून एक मेंढी एक शेळी वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत तर पुन्हा दिनांक एक ऑगस्ट रोज शुक्रवारला सुरतोली येथील रहिवासी वामन राऊत यांच्या म्हशीची तिसरी शिकार केल्याची घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास सुरतोली जंगल शिवारात उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पंधरा दिवसापासून सुरतोली जंगल शिवारात वाघाचा ठिय्या असल्याने शेतकऱ्यांची शेतीचे कामे खोळंबली आहेत.