हिंगोली येथील प्रसिद्ध विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराच्या काळजीवाहू विश्वस्त मंडळ व व्यवस्थापकाला सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी चपराक लगावत संपूर्ण गणेशोत्सव दरम्यान दररोज मोदक वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मोदक वाटप न केल्यास कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे आदेश दिले आहेत. मोदकाच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील चिंतामणी गणपती प्रसिद्ध आहे.