रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत घटक पोलीस कल्याण निधी रायगड व त्याअंतर्गत चालणारे उपक्रम यांची वार्षिक तपासणी करण्याच्या अनुषंगाने चार्टर्ड अकाऊंटंट यांची नेमणूक करावयाचे प्रयोजन असून पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग कार्यालयातून इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट यांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट यांनी पोलीस निरीक्षक इथे अर्ज करावेत. असे आज गुरुवारी संध्याकाळी ५ सुमारास पोलीस निरीक्षक अति.कार्य. पोलीस उप अधीक्षक गृह तानाजी नारनवर यांनी कळविले आहे.