पो. स्टे. रामटेक अंतर्गत येणाऱ्या पिंडकापार (सोनपूर )येथील मत्स्य व्यवसायी एका 75 वर्षीय वृद्धाचा त्याच्याच 32 वर्षीय मुलाने घरगुती वादातून चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि. 3 सप्टेंबरच्या रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान पिंडकापार (सोनपूर) येथे घडली. दुर्दैवाने दुर्दैवी मृतकाचे नाव भाऊराव गोविंदा मांढरे वय 75 वर्ष तर आरोपी मुलाचे नाव रवी भाऊराव मांढरे 32 वर्ष रा.पिंडकपार असे आहे.