गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग व झाडीबोली साहित्यदालन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडीबोली नाट्यसंमेलन (वर्ष-२) १९ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडणार आहे. झाडीपट्टीतील परंपरागत लोककला, भाषा, संस्कृती, आचार-विचार तसेच सामाजिक समस्यांचा अभ्यास व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.