वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात ३० मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका भीषण अपघातात शेतकरी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खंडाळा ते शिऊर बंगला रस्त्यावर ही दुर्घटना घडली असून, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध दि. ६ रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.