बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पोलिस कर्मचारी समीर उदय तावसकर (वय ४०, रा. पांगरी) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील फरार आरोपी मिनी ट्रकचालक अहमद हुसेन बाबामिया चाऊस (रा. मुक्रमाबाद, जि. नांदेड) याला तब्बल अडीच वर्षे पोलिसांना हुलकावणी देत होता. त्या आरोपी पुणे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीस बार्शी न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन सुनावण्यात आली आहे.