कोपरगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता ही एक गंभीर समस्या बनली आहे. बाजारपेठ, बसस्थानक, तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छगृहांची अनुपस्थिती असल्याने महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आज २५ ऑगस्ट रोजी मनसे व सेना ठाकरे गटाच्यावतीने लक्ष वेधण्यात आले आहे.