ग्रामीण भागात असलेल्या सम्राट अशोक बुद्ध विहार विरखंडी येथे क तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन उमरेड विधानसभाचे आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले ,याबाबत चे वृत्त असे की क तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत सम्राट अशोक बुद्ध विहार विरखंडी येथे प्रशासनाच्या वतीने सभामंडप बांधकाम मंजुर करण्यात आले. सदर सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन उमरेड विधानसभाचे आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी आदी नागरिक उपस्थित होते .