राहुरी तालुक्यातील तांदुळनेर परिसरात वाहना-या टॅक्टरचे फोटो अन् व्हीडीओ तहसिलदारांना पाठवून आणि त्यांना फोन करून माहीती दिल्याच्या संशयातुन सेवानिवृत्त अधिका-याला मारहाण करून लुटल्याची घटना घडल्याप्रकरणी राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश पांडुरंग साबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रघुनाथ आंबादास मुसमाडे,गोविंद अशोक साबळे,सागर साहेबराव शिंगोटे, शरद सयराज आरोटे यांच्याविरुद्ध मारहाणीचा लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.