खा प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय,पाल चौक गोंदिया येथे तिरोडा येथील मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस नेत्या वनिताताई ठाकरे यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.राजेंद्र जैन यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले.खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक धोरणांवर व सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला.पक्ष प्रवेशामुळे तालुक्यात महिलांचे संघटन शक्ती वाढेल व पक्ष मजबूत होणार आहे.