चंद्रपूर जिल्ह्यातील मुधोली या गावात ११ वर्षीय अल्पवयीन बालीकेवर ४२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपीचंद आत्राम (वय ४२, रा. मुधोली) याने अल्पवयीन बालीकेवर अत्याचार केला. घटनेच्या वेळी पीडितेचे आईवडील शेतात कामासाठी गेले असल्याने ही संधी साधून आरोपीने हा केला.