पालघर जिल्ह्यात नव्याने तयार होत असलेल्या मुंबई- वडोदरा द्रुतगती महामार्गावर भीषण असा अपघात घडला आहे. भरधाव वेगातील इको कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला दडपून उलटली. गंजाड गावानजीक हा अपघात घडला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. अपघातात अपघातग्रस्त कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.