कारंजा शहरातील मेमन कॉलनी मध्ये भर दिवसा चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसल्याने चोरी करण्यासाठी आणलेले साहित्य ज्यामध्ये चाकू व दोन पेचकस व नायलॉन ची थैली घटनास्थळावर सोडून पसार झाल्याची घटना दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. चोरटे पसार होतानाचा व्हिडिओ मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोराचे रेखाचित्र तयार करून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे.