जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी म्हणजे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२० मधील तरतुदींनुसार विधानसभेच्या अध्यक्षांना दोन आमदारांना सिनेटवर नियुक्त करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ही ऐतिहासिक नियुक्ती जाहीर केली.