तळा तालुक्यातील मौजे मांदाड येथे मांदाड जोड रस्त्याच्या सुधारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ करून गावाच्या विकासासाठी व गावकऱ्यांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मंडळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती आज गुरुवारी संध्याकाळी ५.४४ च्या सुमारास आदिती तटकरे यांच्या ट्विटरद्वारे दिली आहे.